Join us

बिग बॉस मराठी २ मध्ये वैशाली माडे आणि या सदस्यामध्ये होणार कडाक्याचे भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 15:20 IST

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये वादाचा भडका उडणार आहे.

ठळक मुद्देहे भांडण इतके विकोप्याला पोहोचणार आहे की, वैशाली वीणाला म्हणणार आह की “मी तुझ्या बापाला घाबरत नाही”... त्यावर वीणा तिला खडसावून सांगणार आहे की “माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही”

बिग बॉस म्हटला की, या घरात काही जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात तर काही जण एकमेकांचे चेहरे पाहायला देखील तयार नसतात. बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील टीम सदस्यांच्या भांडणामुळेच हा कार्यक्रम चर्चेत असतो. आता बिग बॉस मराठी २ च्या घरात प्रेक्षकांना कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये भाषेवरून वादाचा भडका उडणार आहे... आणि ते दोन सदस्य म्हणजे वीणा जगताप आणि वैशाली माडे आहेत... वैशालीने रूपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी उडणार असून हा वाद चांगलाच वाढत जाणार आहे... ज्यामध्ये वैशाली वीणाला बरंच काही सुनावणार आहे... 

वीणा वैशालीला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की, तू तुझी भाषा सुधारायला हवी त्यावर “मी इथे काही सुधारायला आलेले नाही” असे वैशाली वीणाला सांगणार आहे. इतकेच नाही तर तू माझ्या चुका काढू नकोस, ही तुला शेवटची ताकीद देत आहे असे देखील वैशाली वीणाला सुनावणार आहे... वीणा वैशालीला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की, तू माझ्यावर ओरडू नकोस आणि तुझ्या Warning चा मला काहीही फरक पडत नाही. त्यावर वैशाली म्हणणार आहे की, तू शांत बस मला तू काहीही सांगू नको... हे होत असताना वैशालीने वापरलेले शब्द ऐकून किशोरी आणि वीणा शिव्या देऊ नकोस असे तिला सांगणार आहे... हे भांडण इतके विकोप्याला पोहोचणार आहे की, वैशाली वीणाला म्हणणार आह की “मी तुझ्या बापाला घाबरत नाही”... त्यावर वीणा तिला खडसावून सांगणार आहे की “माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही”

आता हे भांडण का झाले? कोणामुळे झाले? पुढे काय होईल? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीचा हा भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी खात्री या मालिकेच्या टीमला आहे. 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीवैशाली माडेवीणा जगताप