'वडा पाव गर्ल' म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली आणि 'बिग बॉस ओटीटी'ची माजी स्पर्धक चंद्रिका दीक्षित सध्या एका चर्चेत आली आहे. चंद्रिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात तिने आपल्या पतीवर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
चंद्रिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती प्रचंड रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते, "तुला जगाला काय दाखवायचं आहे? गेल्या दोन महिन्यांपासून मी काय सहन करतेय हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मी काम करते, मुलाला सांभाळते, दुकान बघते आणि तू हे सगळं करतोस?" इतकंच नाही तर, चंद्रिकाने पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबतचे चॅट्स लीक केले असून तिचा फोटोही शेअर केला आहे. "माझ्याकडे सर्व पुरावे आहेत", असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
चंद्रिकाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या मते, चंद्रिकाच्या डोळ्यात अश्रू दिसत नसल्यामुळे हे सर्व केवळ 'पब्लिसिटी स्टंट' किंवा नाटक वाटत आहे. एका युजरने कमेंट केली, "दीदी, घरातील प्रश्न इंटरनेटवर सोडवले जातात का? हे ड्रामा वाटतोय" तर दुसऱ्याने लिहिलं, "तुझा अभिनय चांगला आहे, पण डोळ्यात पाणीच नाहीये".
पतीची प्रतिक्रिया अद्याप गुलदस्त्यातचंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर आरोप केले असले तरी, युगमने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हे खरं कौटुंबिक भांडण आहे की नवीन पब्लिसिटी स्टंट, याबाबत आता चर्चा रंगली आहे.
Web Summary : Chandrika Dixit, known as 'Vada Pav Girl,' alleges her husband cheated on her, posting a tearful video and leaked chats. Online, some question the authenticity, calling it a publicity stunt due to the lack of tears. Her husband has yet to respond.
Web Summary : 'वड़ा पाव गर्ल' के नाम से मशहूर चंद्रिका दीक्षित ने पति पर धोखा देने का आरोप लगाया, एक रोता हुआ वीडियो और लीक हुए चैट पोस्ट किए। ऑनलाइन, कुछ लोग प्रामाणिकता पर सवाल उठा रहे हैं, इसे आंसुओं की कमी के कारण प्रचार स्टंट बता रहे हैं। उनके पति ने अभी तक कोई जवाब नहीं दिया है।