Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता-विकीच्या नात्यावर ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:05 IST

टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स अंकिताचे समर्थन करताना दिसले.

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 17" (Bigg Boss 17) या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे अनेकदा भांडताना दिसतात. आता बिग बॉसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातच विकी जैनच्या आई रंजना जैन यांनी अंकितावर अनेक आरोप आणि टीकाही केली. यानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स अंकिताचे समर्थन करताना दिसले. आता मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही अंकिता-विकीच्या नात्यावर भाष्य केलं. 

अंकिता आणि उषा यांनी छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम केलं होतं. उषा यांनी अंकिताच्या सासूची भूमिका साकारली होती.  उषा नाडकर्णी  इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अंकिताच्या लग्नाचा फोटो  शेअर केला आहे. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं, 'त्यांचं लग्न हे मीडिया मसाला किंवा सार्वजनिक समस्या नाही.कोणत्याही प्रकारची टिप्पणी करून ते भांडण वाढवणं थांबूया. त्यांच्या नात्यावर कुठल्याही प्रकराच्या टिप्पणी केल्यास फक्त समस्याच उद्भवू शकतात'. अभिनेत्री रिद्धि डोगरा आणि अभिनेत्री फलक नाजनेही अंकिताचे समर्थन केले आहे. 

अलिकडेच विकीची आई बिग बॉसच्या घरात गेली होती. या शोमध्ये त्यांनी अंकिताला बरंच खरंखोटं सुनावलं. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर दिलेल्या एका मुलाखतीमध्येही अंकितावर ताशेरे ओढले. त्यांनी अंकितावर केलेल्या टीकेमुळे आता विकी आणि अंकिताच्या नात्यावर नेटकरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अंकिताने डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. या दोघांनी ऑक्टोबरमध्ये बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला होता. या घरात ते अनेकदा एकमेकांशी भांडतात. त्यांचं लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.  

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. काही दिवसांतच या शोमधील स्पर्धकांचा प्रवास संपुष्टात येणार आहे. सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :उषा नाडकर्णीसेलिब्रिटीअंकिता लोखंडेबिग बॉस