Join us

उषा नाडकर्णी या कारणामुळे मराठी इंडस्ट्रीत करत नाहीत जास्त काम, म्हणाल्या- "रमते मी सगळीकडेच पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:38 IST

हिंदी आणि मराठीत लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)सध्या चर्चेत आहेत.

हिंदी आणि मराठीत लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)सध्या चर्चेत आहेत. हल्लीच त्यांनी अनेक प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या आहेत आणि तिथे केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. नुकतेच त्या लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मराठी इंडस्ट्रीत जास्त काम का करत नाहीत, यामागचं कारण सांगितलं.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरमध्ये मराठी सिनेविश्वात जास्त न काम करण्यामागचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या की, रमते मी सगळीकडेच. पण मराठीतलं काय काय ठिकाणंच काय बघते ना मग नको वाटतं. जाऊ दे आपण आपलं काम करू. संपलं म्हटलं की घरी जाऊ पण हिंदीमध्ये प्रेम करतात गं आणि तुमचं कौतुक पण करतात. आपल्या मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे. 

म्हणजे मध्यंतरी मला एका प्रॉड्युसर बाईंचा फोन आला होता. मला म्हणाल्या उषा तू खूप छान करतेस पण मी एक बघितलं तिकडे हिंदीत तुला खूपच प्रेम करतात मग आपल्या मराठीत का नाही? म्हटलं बाई मराठीमध्ये जळते सगळ्यांची की आम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलतो हिला कामं कशी मिळतात. बरं मी कोणाचे नंबर माझ्याकडे तू फोन शोध कोणाचे नंबर नाहीयेत कारण मला काय नाटकवाल्यांशी  देणं घेणंच नाहीये. मला तुला फोन करून मला काम दे म्हणायचं नाहीये. आता सुद्धा तू फोन केला म्हणून मी आले. नाहीतर प्रणालीचा नंबर माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे काही लोक असतील एक दोन बाकी कोणाचेच नंबर नाहीयेत. तू उद्या विचारलं अमक्याचा नंबर आहे. नाही घे शोध मी ठेवतच नाही म्हणून हिंदीवाल्यांचे आहेत. ते पण नाहीये कारण मला कोणाला फोनच करायचे नाही. कोणाकडे कामं मागायची नाहीये, असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आजपर्यंत जी उषा आहे ती उषाच्या कामानी आहे तिला एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटीज कराव्या लागल्या नाहीत. मस्का लावावा लागला नाही किंवा सलाम ठोकावा लागला नाही. जर कोण समजत असेल आम्ही हिला काम देतो तर नाही. सॉरी आता सुद्धा कोणाची कामं आली आणि माझे पैसे नसतील मिळणार ना तर मी सांगते दुसरीला बघा.

टॅग्स :उषा नाडकर्णी