Join us

OMG!! ‘ब्रेफिक्रे’ Urfi Javed नं चक्क पोत्यापासून बनवला ड्रेस, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 14:54 IST

Urfi Javed : उर्फी जावेदची चर्चा होते ती तिच्या अतरंगी स्टाईलमुळे. होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

 Urfi Javed New Dress:  उर्फी जावेदची (Urfi Javed) चर्चा होते ती तिच्या अतरंगी स्टाईलमुळे. होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी उर्फी प्लास्टिकचा ड्रेस घालून मिरवते. कधी सेप्टीपिन्सपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते. तर कधी टॉपऐवजी नुसता साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून स्पॉट होते. आता उर्फीने काय करावं तर चक्क पोत्यापासून ड्रेस बनवला आणि तो घालून एकापेक्षा एक भारी पोझ दिल्यात.उर्फीने पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसमधील लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोतं की ड्रेस? असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. हा ड्रेस केवळ 10 मिनिटांत तयार झाला, असंही तिने सांगितलं आहे.

उर्फीचा पोत्यापासून बनवलेला हा ग्लॅमरस ड्रेस काहींना चांगलाच आवडला आहे. तर काहींनी नेहमीप्रमाणे यावरून तिला ट्रोल केलं आहे. कुछ भी..कुछ भी...वैसे इस ड्रेस में अच्छी लग रही है..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. क्रिएटीव्ह...अशा शब्दांत एकाने तिचं कौतुक केलं आहे. काही युजरने मात्र तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे. भिकारी, काहीही घालते, असं एकाने म्हटलं आहे. 

‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद  हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते आणि यामुळे दर दिवसाआड सोशल मीडियावर ट्रेंड करते.

अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उर्फीला यामुळे जराही फरक पडत नाही. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अ‍ॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन