Join us

‘तुला पाहते रे’ मालिकेत टिवस्ट ; आता होणार ‘या’ नव्या पात्राची एंट्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:42 IST

आता एका नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे. ती म्हणजे विक्रांत सरंजामेच्या पत्नीची भूमिका प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.

विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची रोमँटिक केमिस्ट्री ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रेक्षकांना खूप आवडते आहे. सध्या विक्रांत आणि इशाच्या प्रेम कहाणीत बरेच चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात इशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे.  तेव्हा या अडचणी पार करत विक्रांत इशाचे मन कसे जिंकणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. त्यासोबतच या मालिकेत आता एका नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे. होय, आम्ही तुमच्यासाठी ही नवी कोरी बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे विक्रांत सरंजामेच्या पत्नीची भूमिका प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.

तुला पाहते रे’ ही मालिका नियमितपणे बघणाऱ्यांसाठी कदाचित हा आश्चर्याचा धक्का नसेल. कारण मालिकेच्या शीर्षकगीतात तिची झलक पाहायला मिळतेच. पण आता विक्रांत सरंजामेच्या पत्नीची स्पष्ट ओळख प्रेक्षकांना होणार आहे. ही भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिल्पा तुळस्कर. शिल्पाच्या एण्ट्रीने मालिकेत पुन्हा एक नवीन वळण येणार हे नक्की. सुत्रांनुसार, डिसेंबरच्या अखेरीस अभिनेत्री शिल्पा मालिकेत येणार आहे. विशेष म्हणजे विक्रांतचा शत्रू असलेल्या जालिंदरशी निगडीत तिची भूमिका असणार आहे. दुसरीकडे विक्रांत इशाला लवकरच प्रपोज करणार आहे. अशातच शिल्पाच्या एण्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात कमालीचं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार