Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर जुळ्या अभिनेत्रींचा डान्स, व्हिडीओने चाहत्यांना लावलं वेड

By कोमल खांबे | Updated: May 13, 2026 12:40 IST

अनेक सेलिब्रिटींनाही "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. ऐश्वर्या नारकर यांचा या गाण्यावरील रील व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता जुळ्या अभिनेत्रींनी "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर डान्स केला आहे. 

सोशल मीडियावर सध्या संजू राठोडच्या "लाल लाल कलरची बांगडी..." या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. हे गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असून त्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. ऐश्वर्या नारकर यांचा या गाण्यावरील रील व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता जुळ्या अभिनेत्रींनी "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर डान्स केला आहे. 

नेहा शिंदे आणि निकिता शिंदे या दोन जुळ्या बहिणी मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वातील या चिंकी पिंकीने "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर डान्स केला आहे. निकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत त्या दोघी संजू राठोडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्याच्या हुक स्टेप्स त्यांनी केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांनीही या रीलला पसंती दर्शविली आहे. 


नेहा आणि निकिता या अभिनेत्री विद्या सावळे यांच्या जुळ्या मुली आहेत. 'लागीर झालं जी' मालिकेतून विद्या सावळे घराघरात पोहोचल्या. त्यांच्या मुलीही मराठी टेलिव्हिजन विश्वात काम करत आहेत. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत नेहा-निकिता आणि विद्या ही मायलेकींची जोडी पाहायला मिळते. विद्या यांनी 'जीव झाला वेडापिसा', 'राजा राणीची गं जोडी', 'सिंधुताई माझी माई' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Twin actresses' dance on 'Lal Lal Bangadi' song goes viral.

Web Summary : Twin actresses Neha and Nikita Shinde's dance reel on Sanju Rathod's 'Lal Lal Colorchi Bangadi' song is trending. The sisters, daughters of actress Vidya Savle, are popular in Marathi television and star in 'Constable Manju' together.
टॅग्स :टिव्ही कलाकार