Join us

यशला वडील म्हणून स्वीकारण्यास परीचा नकार; यश-नेहापुढे मोठ संकंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 18:58 IST

Mazi tuzi reshimgath: अलिकडेच नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अलिकडेच नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आहे. मात्र, आता या नेहा आणि यशच्या नात्यात मोठा अडथळा निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण, परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा, यश, बंडू काका-काकू दिसून येत आहे. यावेळी जर तू मस्ती केली तर तुझं नाव मी तुझ्या बाबांना सांगणार असं बंडू काका परीला म्हणतात. परंतु, यश माझा मित्र आहे. मी तिला बाबा म्हणणार नाही असं सांगते. त्यामुळे या लग्नाला परीचा नकार असल्याचं दिसून येतं. 

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम गुड्डी नेमकी कोण आहे माहितीये का?  यापूर्वी केलंय 'या' मालिकेत काम 

'यश हा माझा फ्रेंड आहे, बाबा नाही. बाबा सोडून निघून जातात, मला बाबा नको आहे.' असं  रागामध्ये परी म्हणते आणि ती घरातून निघून जाते. त्यामुळे आता परीला कसं समजवायचं हा यक्षप्रश्न यश आणि नेहासमोर उभा राहिला आहे. परंतु, यातून नेहा आणि यश कसा मार्ग काढतील, परील यशचा वडील म्हणून स्वीकार

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन