Join us

डिंपलवर होणार जीवघेणा हल्ला; देवीसिंग काढणार त्याच्या मार्गातील काटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:40 IST

Devmanus 2: डिंपल एकीकडे देवीसिंगविरोधात पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे देवीसिंग मात्र तिच्या हाताला कोणताही पुरावा लागणार नाही याची काळजी घेत आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस' (devmanus 2). या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा  पहिला सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग 'देवमाणसू 2' अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नव्या भागात जुन्या कलाकारांसह काही नवे कलाकारही दिसून येत आहेत. नव्याने सुरु झालेल्या या भागात डॉ. अजितकुमार देव यावेळी गावकऱ्यांसमोर नटवर म्हणून आला आहे. परंतु, हा देवीसिंगच असल्याची खात्री डिंपलला पटली आहे. विशेष म्हणजे हेच आता तिच्या जीवावर बेतणार आहे.

अलिकडेच देवीसिंगने त्याच्या हत्यांचं सत्र सुरु केलं आहे. गावात आल्यानंतर त्याने प्रथम आपल्या पत्नीचा सलोनीचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे सलोनीचा खून नटवरने म्हणजेच देवीसिंगने केल्याची कुणकुण डिंपलला लागली आहे. त्यामुळे ती त्या दिशेने शोध घेत आहे. 

दरम्यान, डिंपल एकीकडे देवीसिंगविरोधात पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे देवीसिंग मात्र तिच्या हाताला कोणताही पुरावा लागणार नाही याची काळजी घेत आहे. इतंकच नाही तर आपलं बिंग फुटेल या भीतीने आता देवीसिंग डिंपलचा काटा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता तो तिच्यावर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिंपल या सगळ्यातून सुखरूप वाचेल कि डिंपलचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील भागात कळेल. 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकिरण गायकवाड