Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबोल प्रीतीची अजब कहाणी: मालिकेत रंगणार मंगळागौरीचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 14:30 IST

मयुरी आणि राजवीर यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असून लवकरच या मालिकेत मंगळागौर साजरी केली जाणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळते. यात खासकरुन सोनी मराठी या वाहिनीवर अनेक नव्या आशयाच्या आणि कथानकाच्या मालिका प्रसारित होत असतात. सध्या या वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या मालिकेत मयुरी आणि राजवीर यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असून लवकरच या मालिकेत मंगळागौर साजरी केली जाणार आहे.

मालिकेत राजवीर आणि मयुरीची प्रेम कहाणी दिवसेंदिवस सुंदर फुलत चालली आहे. पण राजवीरला भाऊसाहेब म्हणजेच मयुरी आहे हे सत्य अद्याप माहित नाही. त्यामुळे त्याला मयुरीचं सत्य समजणार का? किंवा राजवीरला ते कळलं आहे काय ? असे प्रश्न निर्माण करणारे ट्विस्ट आणि टर्न आता मालिकेत पाहायला मिळत आहे. यामध्येच राजवीरच्या घरी यामिनीने पेढीतील महिलांसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी मंगळागौरीचे खेळ ठेवले आहेत. त्यात आता राजवीरने मयुरीला घरच्या मंगळागौरीला बोलावले आहे. त्यामुळे भाऊसाहेबच्या उपस्थितीत मयुरी राजवीरच्या घरी मंगळागौरीला जाणार का हे पहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शिवाय हा खेळ जिंकणाऱ्या महिलेला रोख बक्षिसे सुद्धा मिळणार आहे. आता मयुरी कशाप्रकारे सजून मंगळागौरीला येईल आणि कसे खेळ रंगतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याशिवाय चक्क यामिनी आणि मयुरी यांच्यात मंगळागौर रंगणार आहे ते देखील प्रेक्षकांना पाहता येईल. 

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत  भाऊसाहेब म्हणजेच बॉडीगार्डच्या वेशात असताना मयुरी म्हणून राजवीरला भेटण्यासाठी मयुरीला तारेवरची कसरत करावी लागते. आता तर  मंगळागौरीसाठी बोलावले असल्याने मयुरीला खास मराठमोळ्या पारंपरिक वेशात राजवीरच्या घरी जावे लागणार. या दोन वेगवेगळ्या वेशभूषेतील कसरत मयुरी कशी करणार? त्यासाठी तिला काय काय युक्त्या कराव्या लागतील? का तिची फाजिती होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार