शिवानी सोनार सध्या 'तारिणी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असून स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरची भूमिका साकारत आहे. या मालिकेत शिवानी अॅक्शन सीन्सही करताना दिसते. मालिकेत विविध केसेस सोडवणाऱ्या शिवानीचं खऱ्या आयुष्यातही वर्दीशी खास नातं आहे. शिवानी सोनारचे वडील पोलीस होते. आता त्यांनी निवृत्ती घेतली आहे. अभिनेत्रीने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "आपण कितीही ठरवलं तरी आपल्या आयुष्यातल्या काही माणसांबद्दल आपल्याला व्यक्त होत येत नाही. तसंच काहीसं झालंय. "माझे वडील पोलीस आहेत" कोणालाही माझी ओळख करून देताना हे वाक्य मी कायम बोलायचे. कारण त्यानंतर समोरच्याची आपल्याकडे बघायची नजर, भावना बदलते हे मला माहीत होतं. ३० एप्रिलला माझे वडील निवृत्त झाले. आजोबा गेले म्हणून त्यांच्या जागेवर त्यांना नोकरी लागली होती. ज्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. परिस्थितीमुळे स्वीकारलेली नोकरी गेली ३९ वर्ष ६ महिने त्यांनी अगदी प्रामाणिकपणे निभावली. एखादी गोष्ट इतक्या सातत्याने , प्रामाणिकपणे, कष्टाने करणं ही आणि अशी एकनिष्ठता ५% जरी माझ्यात आली तर धन्य धन्य होईन मी.
पुढे शिवानी म्हणते, "गेली इतकी वर्ष त्यांनी पोलीस खात्यात राहून देशाची सेवा केली. पोलिस वर्दीशी आपलं खास नात आहेच. यात वाद नाही. मला कायमच हे वाटतं की माझ्यात आणि माझ्या भावात शिस्त ही आमच्या वडिलांकडून आली आहे. इतर कोणत्याही ओळखी पेक्षा “ही सोनार साहेबांची मुलगी “ ही ओळख कायमच माझ्या सगळ्यात जास्त जवळची आहे. आपल्याकडे असं म्हणतात की मुलाला बापाची चप्पल पायात बसायला लागली की तो मोठा झाला, पण मुलींना बाप तेव्हा समजायला लागतो जेव्हा “त्याग/ sacrifice” म्हणजे काय हे समजायला लागतं".
"वडील, आता काय तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात आता तुम्हाला हवं तसं आयुष्य जगा, असं मी नाही म्हणणार कारण ते तुम्हाला खूप अवघड जाईल हे माहितीये मला. पण ,जसं जमेल तसं आयुष्याचा आनंद नक्की घ्या. बाकी मी आहेच", असं म्हणत शिवानीने वडिलांप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे.
Web Summary : Shivani Sonar, playing a crime officer in 'Tarini,' shares a deep connection with law enforcement. Her father, a retired police officer, instilled discipline in her. She acknowledges his sacrifices and expresses immense pride in his service to the nation.
Web Summary : 'तारिणी' में क्राइम ऑफिसर की भूमिका निभा रहीं शिवांगी सोनार का कानून प्रवर्तन से गहरा नाता है। उनके पिता, एक सेवानिवृत्त पुलिस अधिकारी, ने उनमें अनुशासन पैदा किया। वह उनके बलिदानों को स्वीकार करती हैं और राष्ट्र की सेवा में उनके योगदान पर गर्व महसूस करती हैं।