रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा. 'लगोरी', 'नांदा सौख्य भरे', 'रंग हे प्रेमाचे', 'चाहूल' या मालिकांमध्ये ती दिसली. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने रेश्माला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. 'देवा', 'लालबागची राणी' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. सध्या रेश्मा 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
रेश्मा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच ती कुटुंबीयांसह तुळजापूरला गेली होती. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तिने दर्शन घेतलं. यावेळी रेश्माचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. तिने हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. पती पवनसोबत तिने आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. "कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगदंब", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. रेश्माने नेसलेली साडी ही हर्षदा खानविलकर यांनी तिला भेट म्हणून दिल्याचं अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रेश्माने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पवनसोबत लग्नगाठ बांधली. पवन साऊथ इंडियन असून त्या दोघांनी महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने लग्न केलं. पवनी आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून तो युकेमध्ये होता. मात्र लग्नानंतर रेश्मासाठी तो भारतात परतला आहे.