दरम्यान, निया शर्मा सध्या ‘ट्विस्टेड-२’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहे. या मालिकेशी संबंधित जबरदस्त फोटोज् ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करीत आहे. काही दिवसांपूर्वीच नियाने दुसºया सीजनविषयी बोलताना म्हटले होते की, ‘ट्विस्टेड-१’ माझ्यासाठी गेम चेंजर ठरला. कारण टीव्हीवरून वेबवर हे माझे पहिले पाऊल होते. मी कधीही स्वत:ला ग्लॅमरस समजले नाही. तसेच कधीही हा विचार केला नाही की, मी आलिया मुखर्जीसारखी भूमिका साकारणार. आता ‘ट्विस्टेड-२’सोबत मी अधिक आत्मविश्वास, ग्लॅमरस आणि आलिया लूकमध्ये अधिक प्रयोग करण्यास उत्सुक आहे.
निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती. तिला ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून खºया अर्थाने लोकप्रियता मिळाली. याव्यतिरिक्त ती ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमच्या सीजन-८ मध्ये झळकली होती. दिल्लीमध्ये जन्मलेल्या नियाने मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तिचे खरे नाव नेहा शर्मा आहे. ‘खतरों के खिलाडी’मध्ये तिने जबरदस्त स्टंट करून लोकप्रियता मिळविली होती.