आकांक्षा पुरी हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. सध्या आकांक्षा तिच्या 'एक आसमान था' या गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यात तिने कोरिओग्राफर आणि अभिनेता असलेल्या सनम जौहरसोबत स्क्रिन शेअर केली आहे. या गाण्यात आकांक्षा आणि सनमचा रोमान्स पाहायला मिळाला. आकांक्षाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला.
आकांक्षाने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं की शूटिंगदरम्यान तिचा ड्रेस निघाला होता. तेव्हा सनमने परिस्थिती सांभाळली. आकांक्षा म्हणाली, "पाऊस पडत होता आणि स्विमिंगपूलमध्ये शूटिंग होतं. स्विमिंगपूलचं पाणी खूप थंड होतं. मी एक डिझायनर गाऊन घातला होता. त्या ड्रेसचा पट्टा निघाला आणि माझा ड्रेस पुढून खाली पडू लागला. हे पाहिल्यानंतर तेवढ्यात समरने मला त्याच्याजवळ ओढलं आणि मला डिझायनर येईपर्यंत मला मिठी मारून ठेवली होती. मी खूप घाबरले होते. पण, माझी लाज जाण्याऱ्या प्रसंगातून त्याने वाचवलं".
हा प्रसंग घडल्यानंतर सुद्धा आकांक्षाने शूटिंग थांबवलं नाही. यातून तिने मार्ग काढत पुन्हा काम सुरू केलं. "एस्प्रेसो शॉट्स माझ्यासाठी फायदेशीर ठरले. पाण्यात उतरताना आणि पाण्यातून बाहेर आल्यावर मी एस्प्रेसो शॉट्स घेतले. टीम तयार होती आणि काय करायचं हे माहीत होतं. त्यामुळे शूटिंग जास्त लांबलंही नाही", असंही तिने सांगितलं.