Join us

मृत्यूशी झुंज देतोय टीव्हीचा हा अभिनेता; उपचारासाठी नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 12:46 IST

सलमान,अक्षयला मदतीचे आवाहन

ठळक मुद्देशिवकुमार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. टीव्ही मालिकांसोबत त्यांनी काही चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत.

छोट्या पडद्यावरचे ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार वर्मा सध्या रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. शिवकुमार दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या ससंर्गाने ग्रस्त आहेत.  त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. अशात आता ते कोरोनाने ग्रस्त असल्याची शंका आहे. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर आर्थिक मदत मागण्याची वेळ आली आहे.सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने त्यांच्या प्रकृतीची माहिती देत, त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. सिन्टाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवकुमार यांच्यासाठी मदत मागितली आहे.

‘मदतीची गरज. सिन्टाचे सदस्य शिवकुमार वर्मा दीर्घकाळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत. सोबतच ते कोरोना संक्रमित असल्याची शक्यता आहे. उपचारासाठी त्यांना पैशांची गरज आहे. त्यांच्यासाठी शक्य ती मदत करा,’असे या पोस्टमध्ये सिन्टाने लिहिले आहे.ही पोस्ट दोनदा रिपोस्ट करण्यात आली आहे. यात अक्षय कुमार, सलमान खान व विद्या बालन या बॉलिवूडच्या कलाकारांनाही टॅग करण्यात आले आहे.शिवकुमार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. टीव्ही मालिकांसोबत त्यांनी काही चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली प्रदर्शित ‘हल्लाबोल’ या सिनेमात त्यांनी काम केले होते. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अजय देवगण, विद्या बालन, पंकज कपूर मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :टेलिव्हिजनसलमान खानअक्षय कुमार