Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्याच्या लग्नाच्याच दिवशी झाले होते वडिलांचे निधन, आता होतेय घटस्फोटाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:56 IST

टिव्ही अभिनेता कृप कपूर सूरी सध्या त्याची आगामी मालिका सुपरनैचुरल थ्रिलर शो 'विष'ला घेऊन चर्चेत आहे. कृप या मालिकेत नेगेटिव्ह भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्दे कृप आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची चर्चा जोरात आहे

टिव्ही अभिनेता कृप कपूर सूरी सध्या त्याची आगामी मालिका सुपरनैचुरल थ्रिलर शो 'विष'ला घेऊन चर्चेत आहे. कृप या मालिकेत नेगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. सध्या कृपच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पसर्नल लाईफ जास्त चर्चेत आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार कृपच्या वैवाहिक आयुष्यात सगळं काही अलबेल नाहीयं. रिपोर्टनुसार कृप आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर जोरात आहे. मात्र अभिनेत्याने या सर्व चर्चा फेटाळून लावत सगळं काही ठीक चालू असल्याचे सांगितले आहे.    

  एका मुलाखती दरम्यान कृपने सांगितले होते की, त्याचे लग्न 6 डिसेंबर 2014 साली झाले आणि त्याचदिवशी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यादिवसानंतर त्याची पत्नी सिमरनवर अनेकांनी निशाणा साधला, तिला अशुभ म्हणून हिणवण्यात आले. कृप म्हणतो की, ज्यानी तिच्यावर हे आरोप लावले त्यांनी विचार करायला हवा होता की मला पहिला ब्रेक लग्नानंतरच मिळाला. सिमरनने प्रत्येक परिस्थितीमध्ये मला साथ दिली आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे.    

रिपोर्टनुसार कृप आपल्या को-स्टारला डेट करतोय  तर सिमरन आपल्या ऑफिसमधल्या व्यक्तिसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती आहे. यावर कृपने स्पष्ट केले की जर तुमची जोडी ऑनस्क्रिन कोणासोबत चांगली दिसत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की खऱ्या आयुष्यातसुद्धा तुम्ही त्या व्यक्तिसोबत रिलेशनशीपमध्ये असाल.   

टॅग्स :टिव्ही कलाकार