Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक माझी लाडकी या मालिकेत या गोष्टीचा होणार उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 15:28 IST

लेक माझी लाडकी या मालिकेचा महाएपिसोड असणार आहे. प्रत्येक आईसाठी तिचं बाळ हे तिचा प्राण असतो. ज्या बाळासाठी सानिकाने असंख्य स्वप्न रंगवली होती ते बाळ आपलं नाही हे सत्य सानिकासमोर येईल का? ती या सत्याचा स्वीकार कसा करेल? हे ‘लेक माझी लाडकी’च्या महाएपिसोड मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ मालिकेमध्ये लवकरच बारशाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. बाळाचं नाव काय ठेवायचं याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मात्र याच कार्यक्रमात इरावतीसमोर एक सत्य उघड होणार आहे. ज्या बाळाचं इतकं कौतुक होतंय ते बाळ सानिकाचं नसल्याचं धक्कादायक वास्तव इरावतीसमोर येणार आहे. हे बाळ नेमकं कुणाचं आहे? सानिकापासून हे सत्य का लपवण्यात आलं? मीराचा या सर्वाशी काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाएपिसोडच्या भागात उलगडणार आहेत.

अत्यंत भावनिक असा हा महाएपिसोड असणार आहे. प्रत्येक आईसाठी तिचं बाळ हे तिचा प्राण असतो. ज्या बाळासाठी सानिकाने असंख्य स्वप्न रंगवली होती ते बाळ आपलं नाही हे सत्य सानिकासमोर येईल का? ती या सत्याचा स्वीकार कसा करेल? हे ‘लेक माझी लाडकी’च्या महाएपिसोड मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' ही मालिका सुरू होऊन आता जवळजवळ वर्षं झाले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील नायिका असलेली सानिका तर चाहत्यांची चांगलीच दाद मिळवत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. तिचे फॅन्स तिला भेटून तिच्या भूमिकेबद्दल नक्कीच कौतुक करत असतात. तिच्या भूमिकेतील त्यांना काय काय आवडते हे तिला आवर्जून सांगतात.आपली भूमिका प्रेक्षकांना आवडतेय, याचे काही अनुभव नक्षत्राला नुकतेच आले. तिने हे अनुभव शेअर केले आहेत. नक्षत्रा सांगते,  गणेशोत्सवानिमित्त मी खरेदीसाठी ठाण्यातल्या एका मॉलमध्ये गेली होती. खरे तर आम्ही कलाकार आमच्या गेटअपपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळे दिसतो. तरीही तिथे असलेल्या एका आजींनी मला लगेचच ओळखले. इतकंच नाही, तर आपल्या सुनेला आणि नातीला बोलावून घेतलं. त्या तिघींनाही माझा अभिनय त्यांना खूप आवडत असल्याचे मला आवर्जून सांगितले आणि या तिघींनी माझ्यासोबत सेल्फी देखील काढला. 

टॅग्स :लेक माझी लाडकी