Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 12:13 IST

नवीन लग्न झाल्यावर आता अधिपती आणि मास्तरीणबाई जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula shikvin Changlach Dhada) ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. नुकतेच या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. नवीन लग्न झाल्यावर आता अक्षरा-अधिपती जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत.

या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या  लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत. 

या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेऊन जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार!

टॅग्स :झी मराठी