Join us  

तुला पाहते रे मालिकेतील इशा-विक्रांतच्या संगीत सोहळ्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 12:19 PM

झी मराठीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इशा आणि विक्रांतचा हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला असून ते दोघे यात रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रेक्षकांना इशा-विक्रांतचे लग्न 13 जानेवारीला सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे. याआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. या दोघांच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विक्रम सरंजामेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. इशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. आता या मालिकेला चांगलेच वळण येणार असून ही मालिका अधिक रंजक होणार आहे.

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली तुला पाहते रे ही मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि वयामध्ये फरक आहे आणि म्हणूनच काही लोकांना त्या दोघांनी एकत्र येणं मान्य नव्हते. त्या दोघांच्या नात्यात दुरावा आणण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. पण आता या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले आहे. त्या दोघांचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे. प्रेक्षकांना इशा-विक्रांतचे लग्न 13 जानेवारीला सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे. याआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. या दोघांच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विक्रांत सरंजामेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

झी मराठीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इशा आणि विक्रांतचा हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला असून ते दोघे यात रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबतच त्यांनी लिहिले आहे की, संगीताचा हा क्षण पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल; पण म्हणून लग्नाचा मुहूर्त चुकवून कसं चालेल... १३ जानेवारी संध्या ७ वा. यायचंय सगळ्यांनी लग्नाला... 

 

टॅग्स :तुला पाहते रे