Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पाठकबाईंचा झाला चांगलाच फायदा, सोशल मीडियावर मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 13:02 IST

फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत.

लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. अभिनेत्री अक्षया देवधर हिची ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाई बनलेली अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तर दुसरीकडे राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीनेही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. याच मालिकेतने कलाकारांनाही एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर अक्षयाने १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यामुळे ती भलतीच खूश असून तिने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 

फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच  तितकंच खास असतं. ते मिळ असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. याच प्रेमामुळेच आनंदी, हसतमुख असून मिळणारं सगळं यश हे फॅन्सचे असल्याचे तिने नमूद केले आहे. 

 तुम्ही जे प्रेम, पाठिंबा दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. सुरक्षित रहा, आनंदी रहा, सकारात्मक रहा, आणि तुझ्यात जीव रंगलाचेही आभार. या मालिकेमुळे हे शक्य झाले” असे अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगला