Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे 'तुझ्यात जीव रंगला' राजाचा स्वॅग होतोय वायरल, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:11 IST

अबालवृद्ध सगळ्यांनीच राजाची स्टाईल फॉलो करत त्याच्या अंदाजात डायलॉग बोलले. राजाचा स्वॅग हा प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली. राजाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच रूप आलं. राणाचा राजा कसा झाला हे प्रेक्षकांना नुकतंच कळलं. राणाच्या लूकची चर्चा होते ना होते तितक्यात त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक ट्रेंड्स लोक फॉलो करतात. नुकतंच राणा म्हणजेच आपला लाडका अभिनेता हार्दिक जोशी याने सोशल मीडियावर राजाचा स्वॅग हे चॅलेंज आपल्या मित्रांना आणि सहकलाकारांना दिलं ज्यामध्ये हार्दिक राजाच्या स्टाईलने डायलॉग बोलत आहे, पण कलाकारच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनी या चॅलेंजला जोरदार प्रतिसाद दिला. अबालवृद्ध सगळ्यांनीच राजाची स्टाईल फॉलो करत त्याच्या अंदाजात डायलॉग बोलले. राजाचा स्वॅग हा प्रेक्षकांना चांगलाच भावला  आहे. राजाला राणा म्हणून गावासमोर नंदिताने हजर जरी केलं असाल तरी राजाची स्टाईल, राजाचं बोलणं, राजाचा अंदाज हा राणापेक्षा खूपच वेगळा आहे. हीच राजाची स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

 राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीची नव्याने मालिकेत एंट्री होणार म्हणून त्याचे प्रमोशनही वेगळ्याच ढंगात करण्यात आले होते. तो मालिका सोडणार असल्याचे वावड्या त्यावेळी उठल्या होत्या. बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनीही चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर एक सरप्राईज चाहत्यांना मिळाले ते म्हणजे राणा दा नव्या रूपात रसिकांच्या भेटीला आला. आणि आता नवीन रूपातला राणा दा रसिकांचे तुफान मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाहार्दिक जोशी