Amruta Pawar Haldi Ceremony : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa ) मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अमृता पवार (Amruta Pawar) हिचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता. उद्या 6 जुलैला अमृता पवारचं लग्न होतयं. होय, नुकतीच अमृता पवारची बॅचलर पार्टी झाली. आता लग्नविधींना सुरूवात झाली आहे. काल अमृताच्या हातावर होणारा नवरा नीलच्या नावाची मेहंदी रंगली. आज तिला हळद लागली. अमृताच्या हळदीचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.
अमृताच्या हळदीला तिचे सगळे जवळचे मित्र मैत्रिणी हजर होते. अभिनेता शुभंकर तावडे आणि टीव्हीच्या अनेक कलाकारांनी अमृताच्या हळदी समारंभात धम्माल मज्जा केली.
हळदीसाठी अमृताने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर फुलांचे दागिणे घातले होते. सर्वाधिक खास होते ते तिचे कानातले. या कानातल्यावर दुल्हनिया असं लिहिलेलं होतं. काल अमृताच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो समोर आले होते. अमृताने नील पाटीलला जोडीदार म्हणून निवडलं आहे. गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आई बाबा आणि आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘दुहेरी’ या मराठी मालिकेतून केली.