Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू चाल पुढं' मालिका रंजळ वळणावर, सोज्वळ अश्विनी झाली ग्लॅमरस; चाहते झाले तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:00 IST

'तू चाल पुढं' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेत नेहमी सोज्वळ दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज नुकताच समोर आला आहे

झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. विशेषकरून या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारत असतलेल्या अभिनेत्री दीपा परबच्याअभिनयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. मालिकेत नेहमी सोज्वळ दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज नुकताच समोर आला आहे. अश्विनीचा ग्लॅमस अंदाज चाहत्यांना देखील भलताच आवडलेला दिसत आहे.

ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये अश्विनीला कॉर्नर करण्याचा प्रयत्न तिच्या सोबतच्या इतर स्पर्धकांकडून केला जातो. ज्यामुळे मिडियामध्ये अश्विनीला टार्गेट केलं जातं. पण यावेळी एपी तिच्या पाठीशी उभा राहतो आणि अश्विनीला सपोर्ट करतो. ़

 

इकडे श्रेयस बंगलोरला गेला आहे आणि त्याला सरप्राईज द्यायला अश्विनी बंगलोरला जातो, तिथे फक्त दोघांना वेळ मिळतो म्हणून श्रेयस खुश होतो. या सगळ्या दरम्यान अश्विनीची इंग्रजीची पण तयारी सुरू आहे. आता अश्विनी तिच्या सर्व संघर्षांवर मात करून स्पर्धा जिंकेल?  हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे.  

टॅग्स :झी मराठी