Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रीलस्टार नाही, आम्ही 'रिअल स्टार' होतो"; तृप्ती देसाईंची 'बिग बॉस मराठी'बद्दल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:05 IST

तृप्ती देसाईंनी 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील आठवणींना उजाळा दिला आहे.

Trupti Desa On Bigg Boss Marathi : महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला आणि प्रचंड लोकप्रिय असलेला रिअ‍ॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.  विशेषतः राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे घरात मोठा धुमाकूळ पाहायला मिळतोय. अशातच 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक तृप्ती देसाईंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील आठवणींना उजाळा दिला आहे. 

तृप्ती देसाई या 'बिग बॉस मराठी ३' मधील स्पर्धक होत्या. तेव्हा महेश मांजरेकर हे होस्ट होते. तृप्ती देसाई यांन त्या सीझनमधला एक व्हिडीओ शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "'बिग बॉस'च्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून सलमान खानचा फोन महेश मांजरेकरांना आला होता. आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे. ते घर आहे.... तिथे माणुसकी, नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडून न देणे हे सर्व सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालेलो होतो".

सध्याच्या सीझनमधील रील स्टार स्पर्धकांच्या वागण्यावर तृप्ती देसाई यांनी उपरोधिक टीका केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्ही रीलस्टार म्हणून नाही 'रिअल स्टार' म्हणून त्या सीझनमध्ये कंटेस्टंट होतो, याचा प्रचंड अभिमान आहे". तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन ११ जानेवारी २०२६ पासून कलर्स मराठी वर सुरू झाला आहे. या पर्वाचे सूत्रसंचाल अभिनेता रितेश देशमुख करत आहेत.  सध्या या शोमध्ये राखी सावंत, सागर कारंडे आणि विशाल कोटियन यांसारखे सदस्य आहेत. नुकतंच सहाव्या आठवड्यात गायक सचिन कुमावत घराबाहेर पडला आहे. हा शो जिओ-हॉटस्टार वरही पाहता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Trupti Desai reminisces about 'Bigg Boss Marathi', takes a dig at contestants.

Web Summary : Trupti Desai shared memories of 'Bigg Boss Marathi 3', asserting its superiority over current seasons. She praised the camaraderie and humanity of her season's contestants, subtly criticizing the behavior of the new 'reel star' participants.
टॅग्स :तृप्ती देसाईबिग बॉस मराठी ६सलमान खानमहेश मांजरेकर रितेश देशमुख