Join us

​विघ्नहर्ता गणेश या मालिकेसाठी आकांक्षा पुरीचे तीन तासांचे कठोर प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:07 IST

गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका. लोकांच्या या लाडक्या गणरायाच्या आयुष्यावर आधारित एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विघ्नहर्ता ...

गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका. लोकांच्या या लाडक्या गणरायाच्या आयुष्यावर आधारित एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विघ्नहर्ता गणेश असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेसाठी खूपच चांगला सेट उभारण्यात आला आहे. तसेच या मालिकेसाठी ग्राफिक्सचा देखील वापर करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या मालिकेसाठी कलाकारांची निवड देखील खूपच चोखंदळपणे करण्यात आली आहे. अनेक कलाकारांचे ऑडिशन घेतल्यानंतरच कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार हे ठरवण्यात आले आहे. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत आकांक्षा पुरी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतल्यानंतर या मालिकेसाठी आकांक्षा पुरीची निवड करण्यात आली आहे. ती या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत पार्वतीची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी सध्या आकांक्षा खूपच जास्त मेहनत घेत आहे. या भूमिकेसाठी ती गेल्या तीन महिन्यांपासून दररोज तीन तास जिममध्ये घाम गाळत आहे.आकांक्षा पुरी सध्या या भूमिकेसाठी खूप अभ्यास देखील करत आहे. पार्वतीविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी ती काही पुस्तकंदेखील वाचत आहे. या मालिकेत आईवडिलांचे म्हणजेच पार्वती आणि शंकराचे आपल्या मुलासोबतचे म्हणजेच गणेशासोबतचे नाते दाखवले जाणार आहे. आकांक्षा या भूमिकेसाठी ती सध्या खूपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी ती सांगते, "मी या भूमिकेसाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच माझा डाएट देखील बदलला आहे. मी पुष्कळ पौराणिक कथा वाचल्या आहेत. व्यक्तिरेखेतले प्रत्येक बारकावे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.