Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर जमणार तीन जिवलग मित्रांचा कट्टा! महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 08:10 IST

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र येणार आहेत. ते पाहणे नक्कीच गमतीदार असेल.

या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेत. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या जुन्या मित्रांसोबत रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र येणार आहेत. ते पाहणे नक्कीच गमतीदार असेल.  पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से  प्रेक्षकांना पाहायला मिळतील. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.

 सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचा गप्पा फारच रंगल्या. शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. त्या वेळी महेश मांजरेकर यांनी  'कूछ तो गडबड है' असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण या वेळी सांगितली.  मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत, तर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणार, असे त्यांनी सांगितले.  

कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपती' विशेष, १७ जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

टॅग्स :महेश मांजरेकर शिवाजी साटमसचिन खेडेकर