Join us

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार हे मोठे बदल, प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:25 IST

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे नव्या आणि दमदार रुपात.

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे नव्या आणि दमदार रुपात. आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे हास्याचा एक भन्नाट महोत्सव जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपले विनोदी कौशल्य सादर करतील. यंदाच्या सीझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँगलॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी, आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे. 

चला हवा येऊ द्याच्या या पर्वात पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लाडके कलाकार श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत  आणि त्यांच्यासोबत दमदार हास्यकलाकार गौरव मोरे आणि अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवही मनोरंजन करताना दिसणार आहेत. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहेत अभिजीत खांडकेकर. त्याच्या उत्साही शैलीमुळे प्रत्येक भाग अधिक रंगतदार आणि मनोरंजक ठरणार आहे. प्रत्येक भागात गँगलॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचे एक विशेष विनोदी सादरीकरण करतील ज्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. त्यासोबतच महाष्ट्रभरातून आलेले २५ विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विडा हाती घेणार आहेत. 

 यंदाच्या सीझनच्या लेखनाची जबाबदारी योगेश शिरसाटने सांभाळली आहे. त्याच्यासोबतच नव्या दमाचे होतकरू लेखक अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील दाखल झाले आहेत. चला हवा येऊ द्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विनोदाची नवी लाट घेऊन येणार आहे. २६ जुलै पासून शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता हे विनोदवीर भेटीला येणार आहेत.

टॅग्स :चला हवा येऊ द्याअभिजीत खांडकेकरश्रेया बुगडेकुशल बद्रिकेभारत गणेशपुरे