या केवळ अफवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 11:21 IST
डान्स प्लस 2 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राघव जुयालचे त्याच्या निर्मात्यांशी वाद झाला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. डान्स प्लस ...
या केवळ अफवाच
डान्स प्लस 2 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राघव जुयालचे त्याच्या निर्मात्यांशी वाद झाला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. डान्स प्लस 2 या कार्यक्रमाच्या प्रमोशनच्यावेळी पोस्टरवर राघवचा फोटो नसल्याने त्याने याबाबत निर्मात्यांकडे तक्रार केली असल्याचेही म्हटले जात होते. पण असे काहीही घडले नसून या सगळ्या केवळ अफवा असल्याचे राघवने म्हटले आहे. राघव सांगतो, "डान्स प्लस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचेही सूत्रसंचालन मीच केले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनसाठी विचारले गेल्यावर मी लगेचच होकार दिला. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत असताना मी माझ्या कुटुंबात परत आलो आहे असेच मला वाटत आहे. तसेच या कार्यक्रमाचा भाग बनण्यासाठी मी छोट्या पडद्यावरच्या अनेक ऑफर्सही नाकारल्या आहेत. मी डान्स प्लस या माझ्या कार्यक्रमात असलेल्या सहभागाबद्द्ल प्रचंड समाधानी आहे."