Join us  

Nupur Alankar: प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय सोडला, संन्यास घेतला, आता हिमालयात जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 9:45 PM

Nupur Alankar: टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून छोटा पडदा गाजवत असलेली दिग्गज अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. नुपर अलंकार यांनी संन्यास घेत हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - भारतात टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे खूप प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक कलाकारांचे फॅन फॉलोविंगही मोठे आहे. दरम्यान, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून छोटा पडदा गाजवत असलेली दिग्गज अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. नुपर अलंकार यांनी संन्यास घेत हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनय सोडत संन्यास घेत असल्याची माहिती स्वत: नुपूर अलंकार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी फेब्रुवारी महिन्यातच संन्यास घेतला आहे. आता मी तीर्थयात्रा आणि गरिबांना मदत करत आहे. आता माझं मन हे अध्यात्मामध्ये गुंतलं आहे. आता मी त्याचंच पालन करेन. नुपूर अलंकार यांनी घेतलेल्या या निर्णयाला त्यांचे पती आणि कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. नुपूर अलंकार या CINTAAच्या सदस्याही राहिल्या आहेत.

नुपूर अलंकार या ४९ वर्षांच्या आहेत. गेल्या २७ वर्षांपासून त्या छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. नुपूर यांनी १५० हून अधिक शोमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटियां, दिया और बाती हम या का्र्यक्रमांचा समावेश आहे. त्याशिवाय नुपूर यांनी राजा जी, सांवरिया आणि सोनाली केबल यासारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूड