Join us

'ठरलं तर मग' फेम अर्जुन उर्फ अमित भानुशाली वडिलांच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला - "आता थोडेफार यश मिळालं तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:30 IST

Amit Bhanushali : शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळतंय की, अमित भानुशाली त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगताना भावुक झालेला पाहायला मिळाला.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ठरलं तर मग (Tharala Tar Mag). या मालिकेतील सायली आणि अर्जुनने रसिकांच्या मनात घर केले आहे. सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे तर अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशाली(Amit Bhanushali)ने. नुकतेच अमित भानुशाली स्टार प्रवाह वाहिनीवरील शिट्टी वाजली रे कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी तो वडिलांची आठवण सांगताना खूप भावुक झाला होता. त्याचा किस्सा ऐकून सेटवरील इतर सहकलाकार देखील इमोशनल झालेले पाहायला मिळाले.

स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाउंटवर शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळतंय की, अमित भानुशाली त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगताना भावुक झालेला पाहायला मिळाला. त्या काळात त्याला वडिलांनी खूप मोठा पाठिंबा दिला होता. यात तो सांगताना दिसतोय की, दीड वर्ष फिरलो ऑडिशन देत देत पण नाही मिळालं काम. जेव्हा हरलो. जॉब घेतला हातात. जॉइनिंग लेटर दिलं बाबांना तेव्हा तोच व्यक्ती होता ज्याने तो लेटर फाडून मला सांगितलं जा बाप आहे. तू स्वप्न पूर्ण कर. आता थोडेफार यश मिळालं तर ते नाहीयेत बघायला. हे सांगताना त्याला रडू कोसळले. त्याचा हा किस्सा ऐकताना सेटवरील इतर कलाकारही भावुक झालेले पाहायला मिळाले.

दरम्यान, अमित याआधी अनेक मालिकांमध्ये दिसला होता. त्याने 'फक्त लढ म्हणा', 'गर्ल्स' अशा काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या अमित 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.