Join us  

चार-एक संघविचारी माझ्याविरोधात आहेत, पण...; किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:12 AM

अभिनेते किरण माने यांची नवी पोस्ट पुन्हा एकदा ठरतेय चर्चेचा विषय.

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियातून (Social Media) अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेतेमंडळी आणि कलाकारीही त्यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. अशाच परिस्थितीत किरण माने यांची नवी पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे माने यांची फेसबुक पोस्ट?'आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू.. मीडियावाले सेटवर जाणार आहेत...अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!!- किरण माने.'काय आहे प्रकरण?'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत कलाकार किरण माने काम करत होते. पण त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेबाबत फेसबुकवर व्यक्त झाल्यानं आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहेत.

टॅग्स :किरण मानेटेलिव्हिजनसोशल मीडिया