Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये हैं महोब्बते'ची कॉपी आहे तेजश्रीची नवीन मालिका? प्रदर्शित होण्यापूर्वीच झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:33 IST

Goshta premachi: मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेनंतर तेजश्री अग्गंबाई सासूबाई या मालिकेत झळकली होती. मात्र, त्यानंतर २ वर्ष ती छोट्या पडद्याकडे फिरकली नाही. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. यामध्येच आता तेजश्री प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला. मात्र, हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी चांगलं ट्रोल केलं आहे. ही मालिका एका हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला. यामध्ये तेजश्री, मुक्ता ही भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता राज हंचनाळे हा सागर या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला सीन पाहून ही मालिका ' ये हैं महोब्बते' या हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं म्हटलं आहे. 

नेमका काय आहे प्रोमो?

गोष्ट प्रेमाची या मालिकेमध्ये मुक्ता (तेजश्री प्रधान)  एक स्वतंत्र विचारांची मुलगी असून ती डेंटिस्ट आहे. तसंच ती कधीच आई होऊ शकत नाही. तर दुसरीकडे सागर हा बिझनेसमॅन आहे. पण, त्याचं पहिलं लग्न झालं आहे. परंतु, पत्नी नसल्यामुळे तो एकटाच मुलीचा सांभाळ करतो. ज्यामुळे त्याची आई त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी मागे लागलेली आहे. सागर आणि मुक्ता एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे सागरच्या मुलीची मुक्तासोबत छान मैत्री असते. त्यामुळे या मुलीच्या माध्यमातून दोघांच्या प्रेमाची गोष्ट कशी सुरु होते हे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

'ये हैं महोब्बते'सोबत होतीये तुलना

गोष्ट प्रेमाची या मालिकेचं कथानक, त्यातील पात्र हे हुबेहूब ये हैं महोब्बते या गाजलेल्या मालिकेसारखं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी ही मालिका सुरु होण्यापूर्वीच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ' हिंदी सीरियलची कॉपी...', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर , 'हे प्रवाहवाले फक्त हिंदी सीरीअलची कॉपी करत आहेत ही आहे ए है मोहोबते....',असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. सोबतच 'बेक्कार प्रोमो आहे, लाडे लाडे बोलणारी तेजश्री प्रधान, hot headed hero, आणि त्याची ती गोड छोटी मुलगी . किती वर्षे तुम्ही हेच आणि हेच दाखवणार आहेत? नवीन विषय काहीच सुचत नाही का हो तुम्हाला?', अशा कितीतरी कमेंट करत लोकांनी या मालिकेला ट्रोल केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनतेजश्री प्रधान सेलिब्रिटी