Join us

शंकराची भूमिका साकारल्यानंतर ‘राधाकृष्ण’ मालिकेत तरुण खन्ना दिसणार हनुमानाच्या व्यक्तिरेखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:22 IST

लवकरच तो याच मालिकेत हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

स्टार भारत वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ मालिकेत आता आणखी एक नवी व्यक्तिरेखा यात पाहायला मिळणार आहे. टीव्ही विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता तरुण खन्ना या मालिकेत तब्बल अडीच वर्षे महादेव शिव शंकराची भूमिका करत आहे. आता लवकरच तो याच मालिकेत हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचे चित्रीकरणही नुकतेच सुरू झाले आहे.

मालिकेत बराच काळ भगवान शिव शंकराची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता तरूण खन्ना आता हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना तो म्हणतो, ‘खरे तर हनुमानाची भूमिका करायला मी नकारच दिला असता, पण ही ऑफर याच प्रॉडक्शन हाऊसने दिली, म्हणून मी ती स्वीकारली. याचे कारण असे की, हे प्रॉडक्शन हाऊस आपल्या मालिकेतील व्यक्तिरेखा खूप छान लिहितात आणि सादर करतात. अन्य प्रॉडक्शन हाऊसना ते जमणार नाही. त्यांनी मलाच या भूमिकेसाठी निवडले याचा अर्थ मीच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो असे त्यांना वाटले असणार... मला आता माझ्या या दोन्ही भूमिकांवर अपार मेहनत घ्यावी लागणार आहे आणि दोन्ही भूमिकांसाठी अनेक तास बसून मेकअप करावा लागेल.’ 

टॅग्स :टेलिव्हिजन