Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनू फेम निधी भानुशालीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 19:43 IST

अभिनेत्री निधी भानुशालीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, अंजली भाभी, सोनू, टप्पू, बबिता या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या सोशल मीडियावर सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

खरेतर निधी भानुशाली हिने २०१९ साली मालिका सोडली. पण त्यानंतरही ती चर्चेत येत असते. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या निधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत ती स्विमिंगपूलमध्ये दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘शांत’ असे लिहिले आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

यापूर्वी निधीने जंगलात फिरतानाचा फोटो शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत निधीने ‘जंगलात फिरण्याचा एक वेगळाच आनंद असल्याचे म्हटले होते. तिचा हा व्हिडीओ एक लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला होता. 

निधी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सोनू ही भूमिका साकारली होती. जवळपास ६ वर्षे तिने या मालिकेत काम केले होते. त्यानंतर २०१९मध्ये तिने मालिकेचा निरोप घेतला.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा