Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या आधी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये होणार धमाका, दयाबेन करणार कमबॅक

By तेजल गावडे | Updated: September 28, 2020 12:25 IST

तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतेच ३००० भाग पूर्ण केले.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतेच ३००० भाग पूर्ण केले. ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता असे सूत्रांकडून समजते आहे की दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, दयाबेन म्हणजेच दिशा वकानी नवरात्री किंवा दिवाळीच्या आधी कमबॅक करणार आहे. कारण दयाबेनच्या पात्राला गरबा खेळायला आवडते अशात नवरात्रीमध्ये पुन्हा तिची एन्ट्री करणे योग्य ठरेल. याशिवाय अशीदेखील चर्चा आहे की जर दिशा वकानी मालिकेत परतली नाही तर दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जाऊ शकते. निर्मात्याना या मालिकेतील आवडते पात्र दयाबेनला चाहत्यांपासून लांब ठेवायचे नाही.

निर्मात्यांच्या माहितीनुसार, दिशाचे कुटुंबाकडून कित्येक प्रकारच्या अटी आहेत. त्यामुळे कित्येकदा तिला मालिकेत परतणे कठीण होत आहे. मात्र आता निर्मात्यांना मालिकेत पुन्हा दयाबेनला आणायचे आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा टीआरपी सध्या खूप चांगला आहे. लॉकडाउननंतर सुरू झालेल्या नव्या भागांना प्रेक्षकांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. जर त्यात या मालिकेत दयाबेनची एन्ट्री झाली तर या मालिकेला चारचाँद लागतील.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी