Join us

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बापूजींमुळे वाचणार गडा इलेक्ट्रॉनिक्स?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:35 IST

तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालालचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेठालालकडे पैसे नसल्याने आता त्याने त्याचे दुकान गडा इलेक्ट्रॉनिक्स विकायचे ठरवले आहे.

ठळक मुद्देगावातील जमीन विकून जेठालालने त्याचे दुकान विकावे असा सल्ला ते जेठालालला देणार आहेत. पण आपल्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेली जमीन विकू नये असे जेठालालला वाटत आहे. या सगळ्यात जेठालाल काय निर्णय घेणार हे सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.  

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची नोकरी गेली आहे, व्यवसायिकांना देखील त्यांच्या व्यवसायात प्रचंड नुकसान झाले आहे. काहींना तर त्यांचे व्यवसाय बंद करावे लागले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्याची व्यवसायिकांची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालालचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे 50 लाख रुपये एका व्यक्तीकडे अडकले असून तो पुन्हा द्यायला तयार नाहीये. जेठालालकडे पैसे नसल्याने आता त्याने त्याचे दुकान गडा इलेक्ट्रॉनिक्स विकायचे ठरवले आहे. दुकान विकून त्याने संपूर्ण कुटुंबाला घेऊन गावी जायचे ठरवले आहे. पण आता त्याच्या मदतीला बापूजी धावून येणार आहेत. गावातील जमीन विकून जेठालालने त्याचे दुकान विकावे असा सल्ला ते जेठालालला देणार आहेत. पण आपल्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेली जमीन विकू नये असे जेठालालला वाटत आहे. या सगळ्यात जेठालाल काय निर्णय घेणार हे सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.  

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा