Join us

'तारक मेहता'चा टप्पू पडला प्रेमात, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:22 IST

भव्या गांधी बॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच तो आता हँडसम दिसतो. मालिकेत झळकत नसला तरी सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच सक्रीय असतो.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले सगळेच कलाकार चाहत्यांचे फेव्हरेट आहेत. त्याततही टप्पूसेना ही तर बच्चेकंपनीची चांगलीच फेव्हरेट आहे. मालिकेत टप्पू भूमिकेत झळकलेला भव्या गांधीने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. इतक्या लहान वयात साकारलेली त्याची भूमिका घराघरात प्रसिद्ध झाली. आता भव्या गांधीने ही मालिका सोडली असली तरी त्याची लोकप्रियता मात्र आजही कायम आहे. छोटा टप्पू आता मोठा झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच तो आता हँडसम दिसतो. मालिकेत झळकत नसला तरी सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच सक्रीय असतो. चाहत्यांच्या संपर्कात असतो.गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतला टप्पू म्हणजेच भव्या गांधी चांगलाच चर्चेत आहे. भव्या गांधी आता त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. भव्या गांधी अभिनेत्री दिगांगणा सूर्यवंशीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

 

दिगांगणाही भव्याप्रमाणेच प्रसिद्ध आहे. तिने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. 'एक वीर की अरदास वीरा' या मालिकेतून ती लोकप्रिय झाली होती. अभिनयाला सुरुवात केली तेव्हा ती फक्त ७ वर्षांची होती. आता दिगांगणाही खूपच सुंदर दिसते.अभिनेत्रीलाही लाजवेल इतकी ती सुंदर दिसते. 

भव्याचे दिगांगणा आधी तारक मेहता मालिकेतल्या निधी भानुशालीसह नाव जोडण्यात आले होते. दोघांचेही अफेअर सुरु असल्याच्या चांगल्याच वावड्या उठल्या होत्या.दोघांनी यावर स्पष्टीकरण देत अफेअर नसल्याचे स्पष्ट केले होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगत अफेअरच्या बातम्यांवर पूर्णविराम दिला होता.कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी दोघांनी घेतली असली तरी जास्त दिवस त्यांच्या प्रेमाची बातमी लपून ठेवू शकले नाहीत. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा