Join us

तारक मेहतमधील टप्पू महिन्याला कमवतो लाखो, कॉर्पोरेटमधील पगारापेक्षा देखील आहे आकडा मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 07:00 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला खूपच चांगले मानधन मिळते.

ठळक मुद्देया मालिकेत आपल्याला टप्पूच्या भूमिकेत राज अंदकतला पाहायला मिळत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला खूपच चांगले मानधन मिळते. या मालिकेत आपल्याला टप्पूच्या भूमिकेत राज अंदकतला पाहायला मिळत आहे. राजला या मालिकेच्या एका भागासाठी किती पैसे मिळतात हे कळल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. राजला एका भागासाठी जवळजवळ 50 हजार रुपये मिळतात. म्हणजेच त्याची महिन्याची कमाई ही कित्येक लाखांच्या घरात आहे. 

राज सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतो. त्याला चांगलीच लोकप्रियता असून त्याचे चाहते त्याला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा