Join us

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नवे ‘तारक मेहता’ पाहून नेटकरी निराश, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:06 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून शैलेश लोढा यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी सचिन श्रॉफ आला आहे. पण हा नवा बदल प्रेक्षकांना फार काही भावला नाही...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण अद्यापही या शोला प्रेक्षक कंटाळलेले नाहीत. आजही हा टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आहे. साहजिकच या ना त्या कारणाने हा शो सतत चर्चेत असतो. सध्या चर्चा आहे ती तारक मेहता या कॅरेक्टरची. होय, शोमध्ये नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे. अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) नवा तारक मेहता बनून शोमध्ये दाखल झाला आहे.

या मालिकेतून शैलेश लोढा  यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी सचिन श्रॉफ आला आहे. पण दुदैर्वाने हा नवा तारक मेहता प्रेक्षकांना फार काही भावला नाही. होय, सोशल मीडियावरच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच दिसतंय. शैलेश लोढा यांच्या जागी सचिन श्रॉफ नवा तारक मेहता म्हणून गोकुलधाम सोसायटीत आला आणि लोकांनी सोशल मीडियावर कमेंट्स सुरू केल्यात. सोबत मीम्सचाही पूर आला. प्रेक्षक काय काय म्हणाले, तर जरा नजर टाकुया...

हे ट्विट वाचून तुम्हाला कळलं असेलच की, लोकांना नवा तारक मेहता फार काही आवडलेला नाही. शैलेश लोढा अनेक वर्षांपासून तारक मेहता हे पात्र साकारत होते. त्यांनी ही भूमिका केवळ साकारली नाही तर ते ही भूमिका अक्षरश: जगले. ते या रोलमध्ये इतके फिट बसले होते की, त्यांच्या जागी सचिन श्रॉफला पाहून चाहते निराश झाले आहेत.

शैलेश लोढा यांनी साकारलेल्या तारक मेहता या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु, मालिकेबरोबर केलेल्या करारामुळे ते नाखुश होते. त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे 14 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांच्या जागी आलेला सचिन श्रॉफ हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. ओटीटीवरच्या ‘आश्रम 3’ या वेबसीरिजमध्येही तुम्ही त्याला पाहिलं असेलच. या सीरिजमध्ये त्याने हुकूमसिंग या राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे.  स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’मालिकेत दिसला होता.   

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनमिम्ससोशल मीडिया