Join us
Daily Top 2Weekly Top 5

 बेफिक्रे !! तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोनूचा बोल्ड अवतार, पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:04 IST

Nidhi Bhanushali : होय, निधीचा हा बोल्ड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देसर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जुनी सोनू अर्थात ही भूमिका साकारणारी निधी भानुशाली (Nidhi Bhanushali ) सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचा एक बोल्ड व्हिडीओ. होय, निधीचा हा बोल्ड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.होय, भिडे मास्तरांच्या या ‘पोरी’चा हा बोल्ड व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.  या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्टरच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी भानुशाली ही आता एका बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. निधीचा मित्र ... ने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. निधीचा बेफिक्रे अंदाज यात पाहायला मिळतेय. गोवा ट्रिपच्या या व्हिडीओत निधी मित्रासोबत अंडरवॉटर मस्ती करताना दिसतेय. निधीचा बिकिनी अवतार तुम्ही याआधीही पाहिला असेलच. पण तिला इतकं धम्माल मस्ती करताना तुम्ही पहिल्यांदाच पाहाल. या व्हिडीओत निधी एका गाण्यावर नाचताना, गाताना दिसत आहे. यावेळी तिने विविध बिकिनी परिधान केल्या आहेत. 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर गेल्यावर्षी तिने ही भूमिका सोडली होती.अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून तिने ही मालिका सोडली होती. आता तिच्याजागी पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारते आहे. निधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून बाद झाली पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  

सर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते. पण तिनेही अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती. तिच्या नंतर‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये निधी भानूशालीची एन्ट्री झाली होती. निधी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा