Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिग बॉसच्या घरात स्वामी ओमवर का भडकली लोपमुद्रा राऊत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 11:08 IST

बिग बॉसच्या घरात काही ना काही वाद नेहमीच सुरू असतात. स्वामी ओम तर रोजच कोणात्या ना कोणत्या कारणामुळे घरातील ...

बिग बॉसच्या घरात काही ना काही वाद नेहमीच सुरू असतात. स्वामी ओम तर रोजच कोणात्या ना कोणत्या कारणामुळे घरातील मंडळींशी भांडतच असतो. लोकांवर कमेंट करण्याची तर त्याची खूप वाईट सवय आहे. त्याच्या या वागणुकीमुळे घरातील सगळीच मंडळी कंटाळली आहेत. बिग बॉसनेदेखील त्याला त्याच्या वागणुकीमुळे फटकारले आहे तर दुसरीकडे सलमाननेदेखील त्याला काही दिवसांपूर्वी चांगलेच सुनावले होते. पण तरीही हा स्वामी अजून काही सुधारलेला नाही. आता त्याचे लक्ष्य बनली आहे लोपमुद्रा राऊत. लोपमुद्रा राऊतवर नुकतीच स्वामीने वैयक्तिक टिप्पणी केली आणि एवढेच नव्हे तर तिच्या कुटुंबियांवरूनदेखील तिला खरे खोटे सुनावले. हे सगळे ऐकून लोपा खूपच चिडली आणि उगाचच लोकांना टार्गेट करणे आणि लोकांवर कमेंट्स करणे स्वामीने बंद करावे असे लोपा त्यांना म्हणाली. लोपाच्या कुटुंबियांबाबत स्वामी बोलल्यामुळे तर ती खूपच भडकली होती. एखाद्यासाठी त्याचे कुटुंब किती महत्त्वाचे आहे याची स्वामीला कल्पनाच नाहीये. त्यामुळे नेहमीच स्वामी लोकांना त्यांच्या कुटुंबियांवरून काही ना काही बोलत असतो, त्यांच्या कुटुंबियांबाबत बोलून त्यांना दुखावत असतो असेही ती म्हणाली. लोपाची बाजू बरोबर आहे याची कल्पना मनू आणि मनवीरला असल्याने तेदेखील या भांडणात सामील झाले आणि त्यांनीदेखील स्वामीला खडे बोल सुनावले. स्वामी नेहमीच तर्क नसलेल्या गोष्टी बोलतो आणि अतिशय वाईट भाषेत सगळ्यांसोबत भांडतो असे त्यांनी म्हटले. या सगळ्यामुळे बिग बॉसच्या घरात चांगलेच वादळ निर्माण झाले होते.