Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरुची अडारकरच्या नव्या मालिकेचा प्रोमो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:09 IST

सुरुचीने काही वर्षांपूर्वी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर ती स्ट्रॉबेरी या नाटकात झळकली.

ठळक मुद्दे'एक घर मंतरलेलं' या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या नुकत्याच भेटीस आला असून या प्रोमोला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला सुरुची अडारकरला पाहायला मिळत आहे.

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं... काय झालं. स्वतःच्या घराबद्दल मनात तसा विचार आला ना? रात्री झोपल्यावर तुमचं घर काय करत असेल? रात्री जेव्हा तुम्ही पाणी प्यायला उठता, तेव्हा पाण्याच्या फिल्टरच्या बाजूला काही हलल्याचा भास कधी जाणवला आहे? किंवा बिछान्यात झोपलो असता बिछाना तुटून तुम्ही खोल पाताळात शिरत आहात असा अनुभव कधी घेतलाय? किंवा तुमच्याच घरात रात्री समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती उभी आहे असे वाटले आहे का? मनात थोडंसं चिर्रर्र झालं ना... असंच किंवा याहून काहीतरी अनपेक्षित असंभवनीय गूढ आणि रहस्यमय अशी नवीन मालिका झी युवावर येत आहे.    आजपर्यंत झी युवा ही वाहिनी त्यावर सुरू असलेल्या विविध मालिकांद्वारे प्रेक्षकांचे  मनोरंजन करत होतीच. पण ही आगामी  मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच पूर्णपणे वेगळी असणार आहे. प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही आवडणार, कथा कशाप्रकारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार, कोणत्या वेळेला ही मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडेल या अशा असंख्य गोष्टींचा विचार करून 'एक घर मंतरलेलं' ही मालिका झी युवावर मार्चच्या पहिल्या आठवड्यात ४ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणार आहे.

'एक घर मंतरलेलं' या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या नुकत्याच भेटीस आला असून या प्रोमोला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला सुरुची अडारकरला पाहायला मिळत आहे. सुरुचीने काही वर्षांपूर्वी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर ती स्ट्रॉबेरी या नाटकात झळकली. या नाटकाच्या यशानंतर ती पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली. तिच्या अंजली या मालिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता पुन्हा एकदा ती झी युवा वरील मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

टॅग्स :झी युवा