दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उजेड आणि आपल्या माणसांसोबतचा साजरा होणारा उत्सव. आणि हाच आनंद अधिक रंगतदार बनवण्यासाठी ‘सन मराठी’ घेऊन येतोय आपुलकीच्या नात्यांनी लखलखणारा ‘दीपोत्सव २०२५’ येत्या १९ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता, प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे संगीत, नृत्य आणि नाटकाचा अप्रतिम संगम.
या खास सोहळ्यात अभिनेत्री सुरेखा कुडची त्यांच्या ठसकेदार लावणीने रंगमंच दणाणवणार तर गायिका वैशाली सामंत आपल्या ठसकेबाज गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकवणार. याचबरोबर, आपल्या गोड आवाजाने मन मोहून टाकणारे गायक आनंद भाटे सुरेल गाण्यांची उधळण करणार आहेत. यासह सोशल मीडियावर महाराष्ट्राला नखरेवाली या गाण्याने धुमाकूळ घालणारी अनुश्री माने, जी आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने दीपोत्सवात रंगत आणणार आहे.
या दीपोत्सवमधील खास आकर्षण म्हणजे 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका तेजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत झळकणार आहे आणि त्याचं हे ऐतिहासिक नाट्य सर्वांच्या अंगावर रोमांच आणणार असणार आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री तितीक्षा तावडे करणार असून कार्यक्रमाची रंगत वाढण्यासाठी 'सन मराठी' वरील खलनायिकांचा परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. दरवेळेस 'सन मराठी' वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमात वेगळेपण निर्माण करत असते. यंदाच्या दीपोत्सवात देखील धमाल गाणी, नाट्य, नृत्याचा अविष्कार प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
Web Summary : Sun Marathi's 'Deepotsav 2025' promises music, dance, and drama on October 19th. Surekha Kudchi's Lavani, Vaishali Samant's songs, and a Shivaji Maharaj act will highlight the celebration. Titiksha Tawde hosts the event featuring performances from 'Sun Marathi' stars.
Web Summary : सन मराठी का 'दीपोत्सव 2025' 19 अक्टूबर को संगीत, नृत्य और नाटक का वादा करता है। सुरेखा कुडची की लावणी, वैशाली सामंत के गाने और शिवाजी महाराज का अभिनय उत्सव की मुख्य विशेषताएं होंगी। तितिक्षा तावडे 'सन मराठी' सितारों के प्रदर्शन के साथ कार्यक्रम की मेजबानी करती हैं।