Suraj Chavan One Month Wedding Anniversary : 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता आणि अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेला सूरज चव्हाण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सूरज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आपली बालमैत्रीण संजना गोफणेसोबत सासवडमध्ये विवाहबंधनात अडकला होता. या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, दोघे आता एका नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. आता सूरज आणि संजनानं आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त 'वन मंथ अॅनिव्हर्सरी' साजरी केली.
सूरज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तो निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतो. सूरज आणि संजना यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त दोघांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज संजनाला गुलाबाची फूल देत प्रेम व्यक्त करताना दिसतोय. यानंतर दोघांनी केक कापत 'वन मंथ अॅनिव्हर्सरी' साजरी केली. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. "आयुष्यभर असेच हसत आनंदात रहा ", "संघर्षात सोबत असणारी सोबती" अशा कमेंटही केल्यात.
सूरज आणि संजनाचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही त्याच्या मामाचीच मुलगी आहे. सूरजने मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. संजना देखील सूरज सारखीच साधी आहे. सूरज चव्हाणने लग्नानंतर बायकोसोबतचे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं होतं,"जी होती मनात तीच बायको केली, Love Marriage Succesful".
Web Summary : Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan and Sanjana celebrated their one-month wedding anniversary. Suraj shared a video on Instagram, expressing his love with a rose and cutting a cake. Fans showered the couple with love and blessings.
Web Summary : बिग बॉस मराठी 5 के विजेता सूरज चव्हाण और संजना ने अपनी शादी की पहली महीने की सालगिरह मनाई। सूरज ने इंस्टाग्राम पर एक वीडियो साझा किया, जिसमें उन्होंने गुलाब देकर अपना प्यार जताया और केक काटा। प्रशंसकों ने युगल पर प्यार और आशीर्वाद बरसाया।