Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सुपर डान्सरच्या ग्रँड फिनालेला शिल्पा शेट्टी थिरकणार या गाण्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 10:07 IST

शिल्पा शेट्टी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ‘मैं आयी हूँ ...

शिल्पा शेट्टी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ‘मैं आयी हूँ यूपी बिहार लूटने’ हे तिचे गाणे तर प्रचंड प्रसिद्ध आहे. या गाण्यावर तिने भन्नाट डान्स केला होता. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 2 या कार्यक्रमात ती सध्या परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत ती देखील काही गाण्यावर थिरकणार आहे. तिने अंतिम फेरीतील नृत्यासाठी काही खास गाण्याची निवड केली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर जिंदा है या चित्रपटातील ‘स्वॅग से स्वागत’ आणि रईस या चित्रपटातील लैला मैं लैला या गीतांवर ती आपले बेली डान्स कौशल्य दाखवणार आहे. शिल्पा सध्या या अंतिम सोहळ्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. तिने या दोन्ही गाण्यांवर प्रॅक्टिस करायला देखील सुरुवात केली आहे. शिल्पा एक चांगली डान्सर असली तरी व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज दोन तास तालिम करत आहे. शिल्पा शेट्टी कुंद्राने अनुराग बसू आणि गीता कपूर यांच्या समवेत या कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रांमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. या शोमधील स्पर्धक हे अत्यंत प्रतिभाशाली आणि गुणी आहेत. त्यांच्यासमोर हे नृत्य सादर करताना त्यास योग्य न्याय देता यायला हवा अशी तिची इच्छा आहे. याविषयीशिल्पा सांगते, “नवीन डान्स शैली शिकायला आणि सादर करायला मला नेहमीच आवडते. यंदाच्या सुपर डान्सर सिझन 2 मध्ये आलेले स्पर्धक अत्यंत गुणी होते आणि या शोचा एक भाग असण्याचा अनुभव अद्भुत होता. मला आशा आहे की, माझे नृत्य त्यांच्या तोडीचे आणि या सत्रात आम्ही पाहिलेल्या अद्भुत नृत्याविष्कारांना न्याय देणारे असेल.”सुपर डान्सरच्या या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.Also Read : राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला ठेवले आहे हे नाव