Join us

Bollywood

Marathi Cinema

Television

Web Series

South Movies

Reviews

Hollywood

प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा

सन ऑफ सरदार २

हृतिकचा 'वॉर २'

चला हवा येऊ द्या

Lokmat.com
Sign in

Bollywood

Marathi Cinema

Television

Web Series

South Movies

Reviews

Hollywood

Photos

Videos

FOLLOW US :

Download App Epaper

सुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:18 IST

सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे यांचा एक व्हिडीओ वाºयासारखा व्हायरल होत आहे. ...

सुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ!

सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे यांचा एक व्हिडीओ वाºयासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सर्वत्र त्याची चर्चाही रंगत आहे. खरं तर चर्चा रंगण्यासारखे त्यास कारणही आहे. होय, व्हिडीओमध्ये शिल्पा आणि सुनील चक्क हानामारी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांचा हा प्रकार शो लाइव्ह सुरू असतानाच सुरू असल्याचे दिसत आहे. आता तुम्ही विचार करीत असाल की खरंच या दोघांमध्ये तसे काही घडले काय? तर तुमच्या माहितीसाठी असे काहीही घडले नसून, त्यांच्या नव्या शोमधील हा एक ड्रामा आहे. ‘जियो धन धना धन’ या नव्या शोमध्ये सुनील आणि शिल्पा पती-पत्नीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. हा व्हिडीओ या शोचाच एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सुनील ग्रोवर याचे नशिब चांगलेच फडफडताना दिसत आहे. कारण त्याचा ‘दन दना दन’ हा शोदेखील प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. नुकतेच सुनीलला विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटाची आॅफर मिळाली. ज्यामध्ये तो चक्क मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘भारत’ या चित्रपटातही सुनीलची एंट्री झाली आहे. या चित्रपटात तो सलमानच्या एका खास मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर शिल्पा शिंदेविषयी सांगायचे झाल्यास अजुनही ती बिग बॉस शोमुळे वादग्रस्त ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केलेल्या एका ट्विटमध्ये पॉर्न वेबसाइटचा उल्लेख केला असल्याने ड्रामा क्वीन हिना खान हिने तिच्यावर हल्ला चढविला होता. त्यामुळे दोघींचा वाद सोशल माध्यमांमध्ये चांगलाच चर्चिला गेला.  
 

शहर

मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा

सेक्शन

मनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य
About UsAdvertise with UsPrivacy PolicyContact UsFeedbackSitemapTerms of UseStatutory provisions on reporting ( sexual offences )Code of ethics for digital news websites

FOLLOW US :

Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd