Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनिधी चौहान गाणार ‘स्टार प्लस’चे नवे गीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 13:28 IST

गेल्या दोन दशकांपासून सुनिधी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करते आहे. बॉलिवूडच्या टॉप सिंगरच्या लिस्टमध्ये तिचं नावं शामिल आहे. याशिवाय अनेक ...

गेल्या दोन दशकांपासून सुनिधी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करते आहे. बॉलिवूडच्या टॉप सिंगरच्या लिस्टमध्ये तिचं नावं शामिल आहे. याशिवाय अनेक रिऑलिटी शोच्या जजची जबाबदारी देखील तिनं पार पडली आहे. आता सुनिधी स्टार प्लससाठी एक प्रमोशनल साँग गाणार आहे. आपल्या सुरेल आवाजात हिंदी चित्रपटांतील असंख्य लोकप्रिय गीते गायलेली ही गायिका आता ‘स्टार प्लस’ वाहिनीचे नवे गीत गाणार आहे.सुनिधीचा मंजुळ आवाज आणि बहुगुणी राम संपत यांची त्याला साजेशी संगीत रचना यामुळे हे गीत श्रोत्यांना भारून टाकेल आणि त्यांना एका सुरेल संगीतसाजाचा आनंद देईल. स्वानंद किरकिरे यांनी या गीताची रचना केली आहे.‘स्टार प्लस’ वाहिनीबरोबरच्या या संयुक्त प्रकल्पाबद्दल सुनिधी चौहान म्हणाली, “मी प्रथमच ‘स्टार प्लस’बरोबर संयुक्त
प्रकल्पात काम करीत आहे. या प्रकल्पावर काम करताना मला खूपच छान अनुभव आला. मला त्यांच्या परिवारात सहभागी करून घेतल्याबद्दल मी ‘स्टार प्लस’ची आभारी असून या प्रकल्पावर काम करताना आमच्यात फार आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत.”सुनिधी चौहान, राम संपत आणि स्वानंद किरकिरे हे संगीताच्या तीन क्षेत्रांतील दिग्गज एकत्र आल्यामुळे ‘स्टार प्लस’चे हे नवे गीत नक्कीच हिट ठरेल असा विश्वासही यावेळी सुनिधीने व्यक्त केला आहे.


सप्टेंबर 2017मध्ये झालेल्या एका शोमध्ये सुनिधीने लाईव्ह परफॉर्मेंस दिला होता यादरम्यान ती प्रेग्नेंट होती. प्रेक्षकांनी उभ राहुन तिला स्टँडिंग ओवेशन दिले होते.  यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या शोमध्ये सुनिधीने अनारकली ड्रेस घातला होता. या शो दरम्यान आपल्या गायकीने सुनिधीने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.सुनिधीने एप्रिल २०१२ मध्ये हितेश सोनिकशी लग्न केले होते. तिचे हे दुसरे लग्न असून वयाच्या अठराव्या वर्षी तिने दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न केले होते. त्यावेळी बॉबी हा ३२ वर्षांचा होता. सुनिधीने इतक्या लहान वयात तिच्यापेक्षा दुप्पट वयाने असलेल्या व्यक्तिशी लग्न करणे तिच्या कुटुंबियांना पटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला सुनिधीच्या घरातल्यांचा प्रचंड विरोध होता. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता तिने लग्न केले. मात्र केवळ वर्षाच्या आता तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला.