छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबूल तौकीर खानच्या घरी लवकरच सनईचे सूर ऐकायला मिळाणार आहेत. 'इमली' बनून घराघरात पोहोचलेली सुंबूल बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनलेली. आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉसमध्ये सुंबुलचे नाव शालीन भानोतसोबत जोडले गेले होते आणि यापूर्वी इमलीचा को-स्टार फहमान खानसोबतची तिची मैत्रीही चर्चेत होती. मात्र, आता फहमान आणि सुंबूल यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. अभिनेत्रीचे वडील तौकीर हसन दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत.
होय, सुंबूल तौकीर खानचे वडील लवकरच दुसरं लग्न करणार आहेत. सुंबूलचे वडील ज्या महिलेशी लग्न करणार आहेत त्या घटस्फोटित आहे आणि तिला आधीच एक मुलगी आहे. सुंबूलने स्वतः वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला दुजोरा दिला आहे.
अभिनेत्रीने सांगितले की तिचे वडील तौकीर हसन एका घटस्फोटित महिलेशी पुनर्विवाह करत आहेत, तिचे नाव निलोफर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निलोफरला पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे, जी लग्नानंतर तिच्यांसोबत राहणार आहे. पुढील आठवड्यात सुंबूलचे वडील लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.सुंबूल 6 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून वडिलांनी तिला सांभाळलं. तिच्या बहिणीनं तिचा सांभाळ केला.