Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कपिल शर्मा शो'मधील सुंगधाचे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार पार पडलं डोहाळे जेवण, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:49 IST

सुंगधाच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात आई होण्याचा आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.

 गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा लवकरच आई होणार आहे. १५ ऑक्टोबरला तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या कॉमेडियन आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. नुकतंच तिचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

२९ ऑक्टोबरचा रविवारी सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांच्यासाठी खूप खास होता. सुंगधा-संकेतने कुटुंबीयांसाठी आणि  जवळच्या मित्र परिवारासाठी मुंबईत बेबी शॉवरचं आयोजन केले होते.  यावेळी सुंगधाने पैठणी साडी नेसली होती. मराठमोळ्या पद्धतीने सुंगधाचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.   डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करताना सुंगधा आणि संकेतने पोस्टमध्ये लिहिले, “आमच्या बाळाच्या येण्याचे सेलिब्रेशन साजर करतोय. आम्ही पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने (डोहाळे जेवण) सर्व विधी केल्या गेल्या.” गेले. ओटी भरणे, पूजा, बर्फी-पेड्याचा खेळ, धनुष्यबाण, केक कापणे, डायपर बदलणे असे मजेदार खेळ देखील झाले. एका स्पेशल गाण्यावर आम्ही परफॉर्म केलं. ज्याला सुंगधाने लिहिले आणि संगीत दिलं होतं.   

 

  सुगंधा आणि संकेतने २८ एप्रिल २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. 15 ऑक्टोबर 2023 रोजी या कपलने प्रेग्नेंन्सीची घोषणा केली. अलीकडेच सुगंधा आणि संकेत यांनी समुद्रकिनाऱ्यावरील एक सुंदर फोटो शेअर केला होता ज्यामध्ये सुगंधा तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली होती.

टॅग्स :सुगंधा मिश्रा