आजकाल यु ट्युब चालू केलं की, गाणी ऐकणे आणि त्या पलीकडे आता ट्रेंड आलाय तो म्हणजे वेब सिरीजचा... त्यात सध्या ट्रेंडीग वेब सिरीज म्हणजे "#फाऊंडर्स"... तसं बघायला गेलो तर या आधी कॅफेमराठीच्या जवळ-जवळ सगळ्या वेब सिरीज या मैत्री, प्रेम, मज्जा यासारख्या विषयावर आधारित होत्या... त्याशिवाय इतरही काही चॅनेलच्या काही वेब सिरीज जर बघितल्या तर त्या ही खूप मजेदार किंवा एखादा विषयावर असते पण स्टार्ट-अप वर वेब सिरीज ही स्टार्ट-अपसारखा विषय जो म्हणजे मराठी तरुण मुलं कितपत या स्टार्ट-अपचा रथ पुढे नेऊ शकतात हे दाखवून देणं, हे खरंच जोखमीचं काम... जे या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळते.
कॅफेमराठीची ओळखच मुळी तरुणाईसाठी नेहमी त्यांचे प्रश्न, त्यांचे आयुष्य, त्यांची स्वप्न दाखवणारा कंण्टेंट लोकांसमोर आणणं अशी आहे... आणि आता त्यांची "#फाऊंडर्स" वेब सिरीज... अनपेक्षित गोष्ट, जी तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर नेहमी घडत असते, ते म्हणजे स्टार्ट-अप पण आपण त्याकडे इतके लक्ष देतोच असे नाही... पण मराठी माणूसही जिद्दीला पेटून स्टार्ट-अप सुरु करू शकतो... या विषयावर प्रकाश टाकणारी वेब सिरीज आणली.. आणि त्यादृष्टीने विचार करायला भाग ही पाडले की, अरे! हो मराठी माणूस स्टार्ट-अपमध्ये इतका मागे का ? कदाचित ही हे दाखवून द्यायचे आहे की मराठी भाषा जशी मागे राहिली नाही तसा मराठी माणूसही मागे राहू शकत नाही... फक्त त्याला जोड हवी योग्य मित्रांची, जोडीदाराची आणि मुख्य म्हणजे अपार कष्टाची... आणि हेच तंतोतंत ओळखून ही सिरीज सगळ्यांसमोर आणली... त्यामुळे कॅफेमराठीची ही वेब सिरीज खूप प्रसिद्ध होणार यात काही शंका नाही...
आतापर्यंत या सिरीजचे तीन एपिसोड समोर आले आहेत... आणि त्यात चार मित्र यश, ह्रिषीकेश, राजू आणि स्वरा ज्यांची खूप जुनी मैत्री आहे.. आणि यश, ह्रिषीकेश, राजू कॉलेज, एकच नोकरी सगळं करून ते वैतागले आहेत... आणि आता त्यांना काहीतरी अजून नवीन शिकायची आणि स्वतः काहीतरी करायची इच्छा आहे... आणि त्या दिशेने ते पावलं उचलायला सुरुवात करतातही, त्यात त्यांना स्वराची खूप मोठी साथ लाभते... या वेब सिरीजच्या सुरुवातीलाच डायलॉग आहे की, “मराठी माणूस हा नेहमी नोकरदार म्हणून बघितला जातो...” मग असं खरंच असेल तर असं का ?मराठी माणूसही त्याच जिद्दीने, हट्टाने स्टार्ट-अप करू शकतो... या सगळ्याचे उत्तर म्हणजे कॅफेमराठीची "#फाऊंडर्स" ही वेब सिरीज आहे... आता तीन एपिसोडमध्ये त्या मित्रांनी बऱ्याच अडचणींना तोंड दिलेलं दिसत आहे... पण त्यांनी हार मानलेली नाही... आता पुढे त्या मित्रांच्या प्रयत्नांना कशी दिशा मिळणार आणि प्रॉब्लेम्सला कसे सामोरे जाणार... हे बघायला नक्कीच आवडेल.